Sambhavami Yuge Yuge is a classical Dance Drama focused on Krishna Neeti, where
Explore Tickets
About Sambhavami Yugey Yugey
Sambhavami Yuge Yuge is a classical Dance Drama focused on Krishna Neeti, where Shri Krishna emerges as a guiding presence, engaging directly with the audience through meaningful storytelling with a powerful blend of Dance and Music.
अभिजात नाट्यगंध मराठी नाटक योजनेचे सभासदत्व (Membership) हे ३ वर्षांसाठी ग्राह्य असेल. आपण सभासद झालेल्या दिवसापासून सभासदत्व सुरु होईल.
सभासद शुल्क Non-refundable आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत मिळणार नाही.
प्रत्येक शहरासाठी / विभागासाठी वेगवेगळे सभासद शुल्क आकारले जाईल.
म्हणजे एका सभासद शुल्कात एका विभागातच नाटके / कार्यक्रम पाहता येतील. दोन अथवा अधिक शहरे / विभाग निवडायचे असल्यास प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे अर्ज भरून स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
(योजनेतील विभाग आणि त्यातील नाट्यगृहे या मेसेजच्या शेवटी दिलेले आहेत.)
योजना कालावधीत ३ वर्षांत एकूण ३० नाटके / कार्यक्रम "सवलतीच्या दरात" पाहता येतील.
(म्हणजेच वार्षिक 10 नाटके / कार्यक्रम; अर्थात महिना सरासरी 1)
योजनेत कोणत्या नाटकांचा / कार्यक्रमांचा समावेश असावा हे आमची निवड समिती त्या त्या महिन्यात ठरवेल.
रंगभूमीवर सुरू असलेली त्या वर्षातील सर्वोत्तम निवडक नाटके अथवा कार्यक्रम योजनेत दाखविली जातील.
हाऊसफुल्ल आणि गर्दी खेचणारी नाटकेच सर्वोत्तम असतात असे नाही. प्रसिद्धी आणि दर्जा यात कधीकधी अंतर असते, हे कृपया समजून घ्यावे.
हाऊसफुल्ल किंवा गर्दी खेचणारी नाटके / कार्यक्रम योजनेत "सवलतीत" दिले जाण्याची शक्यता फार कमी आहे, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी. मात्र योजनेतील नाटके / कार्यक्रम प्रसिद्ध कलाकारांचेच असतील हे नक्की!
योजनेत सुचविण्यात आलेल्या नाटकाची / कार्यक्रमाची दिनांक, ठिकाण व वेळ ४ ते १० दिवस आधी WhatsApp द्वारे कळविण्यात येईल.
(आपला कोणताही WhatsApp ग्रुप नाही.)
योजनेअंतर्गत सुचविलेल्या नाटकाच्या / कार्यक्रमाच्या तिकिटांवर सभासदांना २० % ते ५० % सूट असेल.
ही सूट किती असावी हे नाट्य निर्माते आणि योजनेचे संयोजक प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप / मांडणी / खर्च यावरून ठरवतील.
एका सभासदास जास्तीत जास्त ४ तिकिटांवर सूट मिळेल.
नाटक / कार्यक्रम यांची निवड आमच्या समितीकडे असली, तरीही सुचविलेल्या नाटकास जायचे अथवा नाही हा अधिकार प्रेक्षकांकडे असेल.
मात्र एखाद्या "नाटकाऐवजी दुसरे नाटक" बघता येणार नाही. एखाद्या नाटकास जाणे जमले नाही तर पुढील महिन्यात सुचविलेल्या नाटकासाठी जाण्यास आपण पात्र आहातच!
प्रत्येक नाटकाची / कार्यक्रमाची तिकिटे आपणांस याच वेबसाईट वरून pre-book करणे आवश्यक आहे.
नाट्यगृहात जाऊन तिकिटे काढण्याचा, दुसऱ्या वेबसाईटवरून तिकीटे book करण्याचा किंवा Cash Payment चा पर्याय उपलब्ध नाही. तिकीटे याच वेबसाईटवर book करून तिथेच payment करणे अनिवार्य आहे.
प्रयोगाच्या वेळी नाट्यगृहात कोणती रांग (row) असावी याचा निर्णय संयोजक / निर्माते वेळोवेळी घेतील. प्रत्येक नाटकांसाठी रांगा वेगवेगळ्या असतील.
सभासदांसाठी राखीव असलेल्या रांगा वेबसाईटवर वेगळ्या रंगात highlight केलेल्या असतील, त्यातील तिकीटांवरच सभासदांना सवलत मिळेल.
या योजनेत शक्यतो ७ व्या ते १२ व्या रांगेतील तिकीटे उपलब्ध होतात.
(कृपया अमुकच रांग मिळावी म्हणून प्रेक्षकांनी अडून बसू नये. आजकाल बऱ्याच नाटकांचे तिकीट दर पहिल्या २० रांगांसाठी समान असतात. आपण कमी दरात नाटक पाहणार आहोत आणि आपल्यापेक्षा अधिक रुपये मोजूनही इतर प्रेक्षक आपल्या 'मागे' बसणार आहेत याचाही नम्रपणे विचार करावा.)
फक्त पुढूनच नाटक बघायची सवय असलेल्यांनी कृपया योजना घेताना विचार करावा ही नम्र विनंती.
काहीही मदत हवी असल्यास 91523 66005 (अभिजात नाट्यगंध योजना) हा क्रमांक या योजनेसाठी राखीव आहे. तो SAVE करावा.
उपर्युक्त नियम आणि अटींमध्ये सुधार अथवा बदल करण्याचा संपूर्ण अधिकार 'अभिजात नाट्यगंध योजना' राखून ठेवीत आहे.
वरील सगळ्या नियम आणि अटी स्वीकारूनच आपण सभासदत्व घेतले आहे, हे आपणास मान्य आहे.